आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

अंकिता पाटील-ठाकरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीचे सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मला प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजुन उत्स्फुर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली असल्याचे अंकिता पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या.

या पुरस्कार सोहळ्यावेळी श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यासह  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुरस्कारार्थींचे कौतुक करत त्यांनी अधिकाधिक सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन केले.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us