आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

POLITICAL BREAKING : रोहित पाटील यांना धक्का; राष्ट्रवादीची कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधील सत्ता संपुष्टात

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटलांना भाजपाकडून मोठा धक्का बसला आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक गैरहजर राहिल्याने; कवठेमहाकाळ नगरपंचायतीवरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रोहित पाटील यांच्या गटाकडून राहुल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाकडून सिंधुताई गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आली होती. निवडणुकीत भाजपाच्या सिंधुताई गावडे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

कवठेमहाकाळ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे  बहुमत आहे. एकूण १७ पैकी १० नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. मात्र निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे रोहित पाटील यांच्या गटाकडे संख्याबळ कमी होऊन सहा नगरसेवक होते. परंतु विरोधी घोरपडे गटातील दोन मते राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांना एकूण आठ मते मिळाली. तर भाजपाच्या सिंधुताई गावडे यांनाही आठ मते मिळाली. समान मते मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर सोडत घेतली, ज्यामध्ये सिंधुताई गावडे निवडून आल्या.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us