आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

संतापजनक : चार वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन अत्याचार; आरोपीचा शोध सुरू

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका अज्ञात इसमाने शहरातील चार वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास शहरातून एका चार वर्षीय मुलीचे अपहरण करून पळवून घेऊन गेला. त्यानंतर त्या चिमुकलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले.  त्यामध्ये ती चिमुकली जखमी झाली. त्या इसमाने चिमुकलीला पुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोडले. पिडीत चिमुकलीवर सध्या उपचार चालू आहेत.

या घटनेप्रकरणी शहरात मोठी खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us