
इंदापूर : प्रतिनिधी
भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ शुक्रवारी १० जून रोजी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला गावकऱ्यासह व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद दिला.
शुक्रवारी सकाळी मुस्लिम समाज बांधव गावातील मक्का मस्जिद येथे एकत्रित आले. हाताला काळ्या भिती बांधून हा मूक मोर्चा बाजारतळ, ग्रामपंचायत कार्यालयासमोरून बसस्थानकाजवळ पोहचला. याठिकाणी नुपुर शर्मा यांच्या पोस्टर जाळण्यात आले.
त्यानंतर हा मोर्चा संत तुकाराम महाराज पालखी विसावा चौकापर्यंत जाऊन तेथून परत पोलीस मदत केंद्रावळ पोहोचला. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.दरम्यान, गावातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त पणे पाठिंबा दर्शविला.