आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

डाटा बसत नसेल तर दरेकरांनी मोठा पेनड्राईव्ह आणावा; बाळासाहेब पाटील यांचा सल्ला

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

कऱ्हाड : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारला पेन ड्राईव्हची भीती दाखवणाऱ्यांचा डाटा बसत नसेल तर त्यांनी मोठा पेन ड्राईव्ह आणावा आणि त्यांना पाहिजे ती माहिती त्यांनी त्यात जमा करावी, असा सल्ला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिला आहे.

प्रवीण दरेकर यांच्यावर आम आदमी पक्षाने तक्रार दाखल केल्याने त्यांचा सहकार विभागावर रोष असून ते साताऱ्यात येऊन आरोप करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे काम व्यवस्थित सुरू असून त्यात व्यत्यय आणण्याचे काम विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. विरोधक सातत्याने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासबाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर दरेकर निशाणा साधत आहेत. त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा ते करतात. पेन ड्राईव्ह सादर करण्यात येतील, असे सांगत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना पाहिजे ती माहिती जमा करावी. त्यांचा डाटा बसत नसेल तर त्यांनी मोठा पेन ड्राईव्ह आणावा असा टोलाही पाटील यांनी लगावला.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us