आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

Big Breaking : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत वाढ..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी 

सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. एका महिलेने त्यांच्यावर अत्याचार करुन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

काही दिवसांपूर्वी याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पिडीत महिलेने देशमुख यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप केले आहेत.

याबाबत पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन हा गुन्हा आता सोलापूरला वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुख यांच्यापुढील अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. 


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us