आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

Crime Breaking : लग्नासाठी प्रतिसाद मिळत नसल्यानं युवतीचा चिरला गळा; दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून अनेक धक्कादायक घटना घडल्याचे आपण पाहत असतो. अशीच एक घटना दौंड तालुक्यातील मळद परिसरात घडली आहे. लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका सतरा वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कुरकुंभनजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी राहुल श्रीशैल निरजे (वय २७) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, राहुल निरजे हा संबंधित युवतीवर प्रेम करत होता. या युवतीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

या दरम्यान, त्याने या युवतीला शेतात गाठून तिचा गळा चिरत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत ही युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे.  तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर राहुल निरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us