आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

CRIME BREAKING : ‘गुड बाय लाईफ’ मेसेज करत तरुणीचा खून; तरुणानेही केले विष प्राशन : कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात एका तरुणाने तरुणीचा खून केला. त्यानंतर या तरुणाने नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय लाईफ’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (दि.२०) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

ऋतुजा प्रकाश चोपडे ( वय, २१ रा. खोतवाडी ता. इचलकरंजी ) असे मयत तरुणीचे नाव आहे. तर कैलास आनंदा पाटील ( वय, २८ रा.लिंगनुर ता.कागल ) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि कैलास हे दोघे एकमेकांच्या नात्यातील आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघांच्या लग्नाची बोलणी चालू आहे. मात्र काही नातेवाईकांचा त्यांच्या लग्नास विरोध आहे. मंगळवारी कैलासने ऋतुजाला  भेटण्यास बोलावले. त्यानंतर तो ऋतुजाला चार चाकीतून घेऊन गिरोली घाटात गेला. घाटात तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय लाईफ’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

कैलासने टाकलेल्या मेसेजमुळे त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ पेठ वडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत त्या दोघांचे मोबाईल लोकेशन तपासले. मोबाईल लोकेशन मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ऋतुजाचा खून करण्यात आल्याचे आणि कैलासने विषारी औषध प्राशन केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पेठ वडगाव पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us