आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

CRIME BREAKING : पोलिस अधिकाऱ्याकडून पोलिस कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पीडितेने वरिष्ठांकडे धाव घेत दिला आत्महत्येचा इशारा

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

एका महिला कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत पोलिस अधिकाऱ्याने थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी केली आहे. याबाबत संबंधित महिलेने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित महिला पोलिस कर्मचारी मागील चार वर्षांपासून पन्हाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पन्हाळा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल या महिलेने पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. संबंधित अधिकारी विनाकारण त्रास देत असून सतत लगट करत असतात. तसेच मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने सकाळी तोकड्या चड्डीत पोलिस ठाण्यात येऊन लज्जा उत्पन्न होईल असे चाळे करतात. तसेच पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना काहीही प्रश्न विचारतात.

या अधिकाऱ्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पोलिस ठाण्यातच अनेकदा शारीरिक सुखाची मागणी केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. अधिकाऱ्याची मागणी नाकारल्यामुळे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचेही या तक्रारीत नमूद केले आहे. या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी या महिलेने केली आहे. योग्य न्याय मिळाला नाही तर पोलिस महासंचालकांकडे तक्रार देऊन मुलासह आत्महत्या करण्याचा इशाराही या महिलेने दिला आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या घटनेने कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याच्या कृष्ण कृत्यांची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us