आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

Crime Breaking : एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं सांगली जिल्हा हादरला

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिकानगर भागामध्ये दोघा भावांच्या कुटूंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असून मिरज पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

अंबिकानगर येथे वास्तव्यास असलेल्या वनमोरे कुटुंबियातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा वनमोरे आणि पोपट यल्लपा वनमोरे या दोघा भावाच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे  (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us