आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

BIG BREAKING : भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; चौघेजण जखमी

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

फलटण : प्रतिनिधी

साताऱ्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण आपघात झाला आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा आपघात झाला. या अपघाताच्या घटनेमध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जयकुमार गोरे हे पुण्याहून आपल्या गावी दहिवडीकडे जात होते. यादरम्यान फलटण नजीक पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही अपघाताचे घटना घडली आहे. गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी ३० फूट खड्ड्यात जाऊन कोसळली. गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी जखमी झाले आहेत.

जयकुमार गोरे आणि त्यांच्या अंगरक्षक यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे फलटण येथील खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करुन त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत दोघांना उपचारासाठी बारामती येथे एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us