आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

BIG BREAKING : म्हसोबावाडीतील त्या दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह काढण्यात यश; मृतदेह पाहून उपस्थित हळहळले..! 

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहीरीचं काम सुरु असताना रिंग कोसळून गाडले गेलेल्या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मंगळवारी ही घटना घडली होती. एनडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील एका विहिरीची रिंग कोसळून चार कामगार गाडले गेल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर एनडीआरएफ पथकासह स्थानिक प्रशासनाकडून या कामगारांचा शोध सुरु होता. सलग तीन दिवस हे शोधकार्य सुरु होतं. घटनेत प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे हे कामगार नेमकं कुठल्या बाजूला काम करत होते हे स्पष्ट होत नव्हते.

एनडीआरएफच्या पथकाकडून वेगवेगळ्या पद्धतीने शोधकार्य राबवण्यात येत होतं. आज अखेर सकाळी ११ वाजता पहिला मृतदेह मिळून आला. त्यानंतर काही वेळात सर्वच कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत जावेद मुलाणी, परशुराम चव्हाण, मनोज सावंत आणि सोमनाथ गायकवाड (सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us