आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

BIG BREAKING : स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात पोहोचले.. पण प्रशासनाच्या ‘या’ चुकीमुळे सुनावले खडे बोल..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी आजच रात्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. अजितदादा कोल्हापूरमध्ये येत असल्याचं समजल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विश्रामगृह परिसरात थांबून होते. मात्र प्रशासनाकडून विशेषत: पोलिस यंत्रणेकडून अजित पवार यांचे आगमन होण्यापूर्वीच गर्दी हटवली गेली. ही बाब समजल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या स्टाईलमध्ये प्रशासनाचा समाचार घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. त्यासाठी अजित पवार हे आज रात्रीच कोल्हापूरमध्ये पोहोचले. अजितदादा कोल्हापूरमध्ये येत आहेत समजल्यानंतर कार्यकर्त्यांसह नागरिक आणि पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. परंतु अजितदादांच्या आगमनापूर्वीच पोलिस यंत्रणेकडून भेटीसाठी आलेल्या लोकांना अटकाव करण्यात आला.

अजितदादा कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाल्यानंतर त्यांना ही बाब समजली. त्यांनी तात्काळ पोलिस यंत्रणेसह स्थानिक प्रशासनाला खडे बोल सुनावत नाराजी व्यक्त केली. सामान्य जनता, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं वागणं बरं नाही अशा शब्दांत अजितदादांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सतत लोकांमध्ये मिसळणारे नेते म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे दादांची भेट म्हणजे हमखास कामाची हमी असं अलिखित सूत्रच प्रचलित आहे. सामान्य जनतेसाठी आपण पदावर आहोत आणि त्यांची अडचण तात्काळ दूर व्हावी यासाठी अजितदादा प्रयत्नशील असतात. अशात प्रशासकीय यंत्रणेने अजितदादांच्या परस्परच नागरिक आणि कार्यकर्त्यांना भेट नाकारल्यानं अजितदादांनी या प्रकारानंतर आपल्या स्टाईलमध्ये संबंधित यंत्रणेला कानपिचक्या दिल्या. या प्रकारानंतर अजितदादांची कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता मात्र प्रशासनासह उपस्थितांना अनुभवायला मिळाली.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us