नीरा : प्रतिनिधी
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील वीर धरणाच्या विद्युतगृहातून शुक्रवारी (दि.१५) १ हजार ७०० क्युसेक्स व एका दरवाजातून ४ हजार ४१८ क्युसेक्स असे ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.
शुक्रवारी ( दि.१५) सकाळी सहा वाजलेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत पावसाची आकडेवारी घेतली असता
नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेञात ३८ मि.मी, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेञात ७ मि.मी तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेञात ४३ मि.मी.पाऊस पडला. या पाण्याची आवक वीर धरणात झाली. त्यामुळे वीर धरण शुक्रवारी ( दि.१५) दुपारी चार वाजता ९३.२० टक्के भरले.
परिणामी शुक्रवारी ( दि.१५) सकाळी साडेदहा वाजता वीर धरणावरील नीरा उजव्या कालव्याच्या विद्युतगृहातून १ हजार ४०० क्युसेक्सने व नीरा डाव्या कालव्याच्या विद्युतगृहातून ३०० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने
विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. तसेच दुपारी दोन वाजता वीर धरणाच्या एका दरवाजातून ४ हजार ४१८ क्युसेक्स असे एकूण ६ हजार ११८ क्युसेक्स प्रतिसेकंदाने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला.तसेच गुंजवणी धरणाच्या विद्युतगृहातून २५० क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी दिली.
शुक्रवारी ( दि.१५) दुपारी चार वाजेपर्यंत नीरा खोऱ्यातील पाणी साठ्याची आकडेवारी
अ.नं. धरण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
(टीएमसी) %
१) नीरा देवघर ५.०३८ ४२.९५
२) भाटघर ११.५६५ ४९.२१
३) वीर ८.७६७ ९३.२०
४) गुंजवणी २.५३१ ६८.६०