आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

नायलॉनच्या दोरीने गळा आवळून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न; इंदापूर तालुक्यातील घटना

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

वालचंदनगर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी येथे पतीनेच पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत लतिका सुधाकर शिंदे (वय ३२ वर्षे) यांनी वालचंदनर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुधाकर हरिभाऊ शिंदे (वय ३५ वर्षे )याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सुधाकर हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरी जेवण करत होता. त्याचे वडील बाहेर कामानिमित्त चालले होते. त्यामुळे त्याच्या आईने त्याला शेतात जाण्यास सांगितले.  त्यावर त्याने ‘मी बाहेर गेल्यानंतर तुमच्या दोघींना रान मोकळे होईल’ असे उत्तर दिले. त्याच रागातून त्याने पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी त्याचे वडील उपस्थित असल्याने त्यांनी त्याचा प्रतिकार  करून लतिकाची सुटका केली. चिडलेल्या

सुधाकरने त्याच्या  आई-वडिलांनाही मारहाण केली. याबाबत सुधाकरच्या पत्नीने वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून सुधाकर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कसपटे करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us