मुंबई : प्रतिनिधी
सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी फायद्याची बातमी आहे. राज्य शासनाने विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरतीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. जवळपास ४ हजार ४९७ जागांची भरती होणार असून त्यासाठी २४ नोव्हेंबर २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
जलसंपदा विभागाने सुरू केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर २०२३ ही आहे. याबाबत अधिक माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात आली असून सविस्तर माहिती वाचून अर्ज करावा.
खालील पदांची भरती होणार
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी- ₹.१०००/-, मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ नोव्हेंबर २०२३
असा असेल पगार
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – ४४,९०० ते १,४२,४००
निम्नश्रेणी लघुलेखक – ४१,८०० ते १,३२,३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – ४१,८०० ते १,३२,३००
भूवैज्ञानिक सहाय्यक – ३८,६०० ते १,२२,८००
आरेखक – २९,२०० ते ९२,३००
सहाय्यक आरेखक – २५,५००ते ८१,१००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – २५,५०० ते ८१,१००
प्रयोगशाळा सहाय्यक – २१,७०० ते ६९,१००
अनुरेखक – २१,७०० ते ६९,१००
दप्तर कारकुन – १९,९०० ते ६३,२००
मोजणीदार – १९,९०० ते ६३,२००
कालवा निरीक्षक – १९,९०० ते ६३,२००
सहाय्यक भांडारपाल – १९,९०० ते ६३,२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – १९,९०० ते ६३,२००