
मुंबई: प्रतिनिधी
विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजून सुरूच आहे. संप मागे घेण्यासाठी आवाहन केले तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने थेट भरती प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक एसटी या वापराविना आगारात पडून आहेत. संप मागेच घ्यायचा नाही ही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची थेट भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये निवृत्त चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी महामंडळाने या निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर परतले नाही. त्यामुळे महामंडळाने तब्बल दोन हजार ड्रायव्हर्सची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे लवकरच प्रवाशांच्या सेवेत एसटी दाखल होणार आहे.