आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्र

Crime News : पोलिसांसोबत अरेरावी पडली महागात; दौंड पोलिसांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

पुणे
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधीनाकाबंदी करत असलेल्या पोलिसांबरोबर वाद घालणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वाद घातल्याप्रकरणी त्याला तुरुंगात जावे लागले आहे. दौंड पोलिसांनी या तरुणाचा करेक्ट कार्यक्रम करत त्याला अटक केली आहे.  

अवधूत ज्ञानदेव राऊत (वय ३१ वर्षे,  रा.काष्टी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस सायंकाळच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते.

संबंधित तरुण चारचाकी गाडीतून विनामास्क गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याची गाडी थांबवून मास्क आणि कागदपत्रांची विचारणा केली. त्यावर तो  पोलिसांच्या अंगावर धावून गेला. मी माझ्या गाडीत बसलो आहे. त्यामुळे मला मास्क लावण्याची गरज नाही, असे म्हणून त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय घोडके यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी अवधूत राऊत याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन या तरुणाला अटक केली आहे.  


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us
%d