आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

CRIME BREAKING : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षांच्या मुलाचा आईनंच केला खून, प्रियकराच्या मदतीनं केला घात

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

जेजूरी : प्रतिनिधी

चार वर्षाच्या मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरसजवळील घाटात फेकून दिल्याचा प्रकार दीड महिन्यांपूर्वी घडला होता. त्यानंतर मोडलिंब येथे राहणाऱ्या आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून जेजूरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

चुटक्या शंकर पवार (वय ४) असे या खून झालेल्या चिमूकल्याचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी आई रेणू शंकर पवार (वय २०) व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके (वय २१, दोघेही रा. मोडलींब, ता माढा, जि. सोलापूर) या दोघांना जेजुरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मोडलिंब येथे राहणाऱ्या रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या या संबंधात चुटक्या शंकर पवार हा चिमुकला अडथळा ठरत होता. त्यामुळे या दोघांनी दीड महिन्यांपूर्वी कट रचत या चिमूकल्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला होता.

याबाबत रेणूच्या चुलत बहिणीने जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या दोघांनीही दुचाकीवरून येवून चुटक्याचा मृतदेह भुलेश्वर घाटात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत. या घटनेनंतर जेजूरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे अधिक तपास करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांच्या पथकाने या खूनाचा छडा लावला.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d