आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG NEWS : ड्रोनच्या बारामती परिसरात घिरट्या; अजितदादांच्या सुचनेनंतर पोलिस यंत्रणा लागली कामाला, ड्रोनसाठी घेतली जाणार तज्ञांची मदत

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ड्रोन प्रकरणात विशेष तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. केवळ बारामती तालुक्यातच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत.

या प्रकाराची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ड्रोन प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. तसेच रात्री-अपरात्री दिसणाऱ्या ड्रोनमुळे घाबरून न जाता पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामतीसह सुपा, वडगाव निंबाळकर, यावत, दौंड, भिगवण या परिसरात ड्रोन दिसून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बारामती शहर पोलिस ठाणे ०२११२-२२४३३३, सुपा पोलिस ठाणे ०२११२-२०२०३३, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे ०२११२-२७२१३३, दौंड पोलिस ठाणे ०२११७-२६२३३३, यवत पोलिस ठाणे ०२११९-२७४२३३ या क्रमांकांवर किंवा पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी ०२०-२५६५७१७१ व २५६५७१७२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us