आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG BREAKING : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं; १८ ऑगस्ट रोजी मतदान

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. आज निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषद आणि चार नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद व चार नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम आज जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून २० जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या सूचनेनुसार २२ ते २८ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळांवर उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. २९ जुलै रोजी वैध उमेदवारी अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली जाणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर लगेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ ऑगस्ट रोजी मतदान होवून दुसऱ्या दिवशी अर्थात १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us