आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

Big Breaking : अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात; शरद पवार यांच्यावरील टीका भोवली..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला भोवलं आहे. केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून आता तिच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

अॅड. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळे हिने शेअर करत शरद पवार यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी केतकीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आज दुपारी ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

राज्यभरात तक्रारी दाखल होत असतानाच ठाणे आणि पुण्यात केटकीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे केतकी चितळे हिच्यासमोरील अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us