Site icon Aapli Baramati News

प्रविण दरेकर यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणतात, माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नकार दिला आहे. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मी या विषयावर बोलणार नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

प्रविण दरेकर यांनी काल महिलांबद्दल वादग्रस्त विधान करत राष्ट्रवादीवर टिका केली होती. याबद्दल आज इंदापूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, अशा शब्दात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

साकीनाका : आरोपींना फाशीच हवी.. 

साकीनाका दुर्घटनेवर बोलताना त्यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.  साकीनाका येथील घटना अत्यंत दुर्देवी व वाईट आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या सर्वांची हीच मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पोलिसांना व संबंधित खात्याला आदेश दिलेला असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version