आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणपिंपरी-चिंचवडपुणेमहानगरेमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड : तब्बल दोन लाख रुपयांना तरुणाला घातला ऑनलाईन गंडा..!

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी

अनेकदा अज्ञात व्यक्ती तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतात आणि तुम्ही पण ते लगेच डाऊनलोड करता. असे करत असाल तर थांबा? कारण चिंचवडगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून तरुणाच्या बँक खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढून घेतली आहे. हा सर्व प्रकार रविराज सतीश कर्णे या तरुणासोबत घडला आहे.

रवीराज सतीश कर्णे (रा. चिंचवडगाव, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. रविराज यांचे मोबाईल मध्ये योनो ॲप्लिकेशन चालत नसल्याने त्यांनी ऑनलाईन कस्टमर केअरला फोन केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन उचलला आणि अॅनडेस नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

रविराज यांनी त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या दरम्यान आपला बँक बॅलन्स चेक केला. त्यावेळी केवळ बँकेत दहा रुपये शिल्लक असल्याचे त्यांना दिसून आले. बँकेत चौकशी केल्यानंतर सेविंग अकाउंट वर व डिपॉझिट वर केलेले पैसे खात्यावर ट्रान्सफर झाले आहेत. तसेच एटीएम मधून २०  हजार रुपये काढून घेतले असल्याचे आढळले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us