पुणे : प्रतिनिधी
पोलीसांनी गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपीला अटक करण्यात चार वर्षांनी पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नांनज या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-३ पथकाने केली आहे.
दीपक रमेश आमले ( वय २९ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डनजवळ, कोथरूड सध्या रा. नांनज ता.जामखेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्का अंतर्गत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दीपक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. चार वर्षांपासून पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.
दीपक आमले हा शेतात लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नांनज येथून दीपकला अटक करण्यात आली आहे. त्याला सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे – १ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस अंमलदार पडवाळ आणि टेकावडे यांनी केली