Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : बारामती शहरात जीवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या बारामती शहरातील एका युवकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली आहे.

रोहित उर्फ बापू निकम (वय ३१, रा. श्रीरामनगर, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक बारामती शहरात फरार आरोपींच्या शोधासाठी पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना एकजण गावठी पिस्तुलासह श्रीरामनगर येथे भिगवण रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार या पथकाने श्रीरामनगर परिसरात जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्याने कमरेला आतील बाजूस एक गावठी पिस्तूल लावल्याचे आढळून आले.  या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलिस हवालदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल आहीवळे, पोलिस नाईक नीलेश शिंदे यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version