Site icon Aapli Baramati News

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं आज निधन झालं आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रसिध्द दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली होती.  फायर, नागपंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.  त्यांना खरी ओळख ‘सुहाग’ या चित्रपटातून मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात काम केले होते.

आई, मावशी, आजी, काकू अशा नानाविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. पिंजरा या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली. राक्षसी महत्वकांक्षा, रणदुदुंभी, त्राटिका, बेबंदशाही, रायगडला जेव्हा जाग येते  आणि संगीत संशयकल्लोळ या नाटकातही त्यांनी काम केले होते.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version