Site icon Aapli Baramati News

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अनेक मराठी आणि हिंदी मालिकांसह चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री आसावरी जोशी या उद्या (गुरुवार दि. ७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती. मात्र काही कारणास्तव पक्ष प्रवेश लांबणीवर पडला होता.

गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागात अनेक दिग्गज कलाकारांनी प्रवेश करत राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यातच आता आसावरी जोशी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

अभिनेत्री आसावरी जोशी या हिंदी आणि मराठी सिने आणि मालिका वर्तुळातलं एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक हिंदी मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. आता त्या राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागात महत्वाच्या पदावर कार्यरत होतील.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version