
मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच ओमीक्रॉनचा वाढता प्रसार डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत सध्या देशात लॉकडाउन लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बैठकीत संबोधताना नरेंद्र मोदी म्हणाले, १३० कोटी भारतीय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढा देत आहोत. अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून ओमीक्रॉनबाबत संशय दूर झाला. अमेरिकेत १४ लाख केसेस सापडल्या आहेत. मी भारतात लक्ष ठेवून आहे. भारतात येत्या काळात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, पण भारतीयांनी घाबरून दुर्लक्ष करू नये.
भारतात ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर ७० टक्के लोकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. भारत ३ कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोना कालावधीत देशाचं आर्थिक नुकसान झाले, पुढे असे होऊ द्यायचं नाही. सामान्य लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक गती कमी होऊ नये, याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ३० राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचनादेखील केल्या. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या बैठकीत सहभागी झाले होते.