आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ..!

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति सिलिंडर १०४ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने भाववाढ सुरूच आहे. १ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरचा दर तब्बल २६८.५०  रुपयांनी वाढवण्यात आला होता. आज पुन्हा त्यामध्ये १०४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन दरानुसार व्यावसायिक सिलिंडर २३५५ रुपयांवर पोहोचला आहे.

महागाई थांबेना..!

दरम्यान, आज व्यावसायिक गॅस सिंलिडरच्या दरात १०४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यातच आता व्यावसायिक सिलिंडरचा दरही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेलचे दरही वाढवण्याशिवाय पर्याय नाही.

पेट्रोल-डिझेल जैसे थे..!

गॅस सिलिंडरचा दर वाढलेला असतानाच पेट्रोल डिझेलच्या दरात मात्र कसलीही वाढ झालेली नाही. ६ एप्रिलनंतर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण
Back to top button
Contact Us