आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

नरेंद्र मोदींनी भांडवलदारांसाठी देश विकायला काढला : मेधा पाटकर

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

देशातील  अमाप संपत्तीची लूट केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी आपल्या जवळच्या भांडवलदारांसाठी देश विकायला काढला आहे. परंतु नरेंद्र मोदी यांना देशातील शेतकऱ्यांनी हरवले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. देशाची भांडवलदारांकडून होत असलेली लूट थांबवायची आहे. त्यासाठी आता आमची ही लढाई आहे, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले आहे.

शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला वर्षपूर्वीच्या आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर विराट शेतकरी पंचायत आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देशातील अनेक शेतकरी संघटनांचे नेते आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले  होते. यावेळी बोलताना मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत आता लढाई सुरू झाल्याचे सांगितले.  

केंद्र सरकारकडून टाळेबंदीच्या काळामध्ये भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी २१ कायदे करण्यात आले. हे कायदे लागू व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविण्यात आला. लोकांवर आज उपाशी मारण्याची वेळ आली आहे. आपले हक्क मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला देश वाचवण्याची गरज असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले आहे.

आम्ही  आमचे हक्क मिळवून घेऊ. शेतीच्या पिकांना हमीभाव घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे संसदेमध्ये ४ डिसेंबरला निर्णय घेण्यात येईल तो पाहू. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे सांगून मेधा पाटकर म्हणाल्या,

कृषी कायदे मागे घेण्यात आले. आमचा हा पहिला विजय आहे. मात्र यापुढे आमची आणखी लढाई बाकी आहे. देशातील भांडवलदार लोकांकडून होत असलेली लूट थांबविण्यासाठी आमची लढाई आता सुरू झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us