आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

देशात दागीने ‘हॉलमार्कींग’ कायद्याची आजपासून अमलबजावणी

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मंगळवारी (दि.१५) रात्री उशीरापर्यंत केंद्रीय उद्योग व ग्राहक व्यापार मंत्री पियुश गोयल यांच्यासोबत इंडीयन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन व इतर सराफ संघटनाच्या प्रतिनिधीशी झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला असुन पुर्वीच्या कायद्यात काही बदल करुन आजपासून देशभरात ज्वेलरी वरील हॉलमार्कींग कायद्याची अमलबजावणी सुरु करण्यात येत असल्याचे केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले व तसा आदेश दिला आहे, अशी माहीती इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक किरण आळंदीकर यानी दिली.

केंद्र सरकारने सोने चांदीच्या व्यवसायात अधिक पारदर्शीपणा यावा म्हणून हॉलमार्क कायदा केला आहे. त्याची अमलबजावणी १ जुनपासुन होणार होती, मात्र व्यापारी वर्गानी हॉलमार्क सेंटर सर्वत्र उपलबध नसल्याची अडचण सरकारला दाखवुन दिल्याने व कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर जुना माल तत्काळ हॉलमार्क करणे अशक्य असल्याचे सकृत दर्शनी दाखवल्यामुळे मंत्रालयाने १ सप्टेंबरपर्यंत जुना स्टॉक हॉलमार्क करण्यास मुदत दिली आहे. तत्पूर्वी कोणताही अधिकारी सोन्याच्या दुकानात सबंधीत तपासासाठी जाणार नाही असे स्पष्ट केले.

सध्या देशभरात ९४० हॉलमार्कींग सेंटर असुन वर्षातील ३०० दिवसात जवळपास १४ कोटी दागीने हॉलमार्क होवु शकतात अशी माहीती इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चीम भारताचे प्रमुख विजय लष्करे यानी दिली.उद्योग व ग्राहक मंत्रालयाने चर्चेत सकारात्मक तोडगा काढल्याने देशभरातील फक्त हॉलमार्क सेंटर असलेल्या २५६ जिल्ह्यात हॉलमार्कींग लागु होणार आहे.

४० लाख रुपयांच्या आतील वार्षीक उलाढाल असलेल्या व्यापारी वर्गाला सक्ती केली नाही. तसेच २० ,२३ व २४ कॅरेटच्या हॉलमार्कींगला मान्यता देण्यात आली आहे.
१०० वर्षापुर्वीची राष्ट्रीय संस्था असलेल्या इंडियन बुलीयन ज्वेलर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र मेहता व सहकारी वर्गानी आपली अडचण पद्धतशीर व सनदशीर मार्गाने मंत्रालयाच्या निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे देशभरातल्या व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे, असे मत ईब्जाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यानी व्यक्त केले.

बारामतीला सोने चांदीच्या शुद्धतेची परंपरा आहे. त्याचप्रमाणे २३ व २४ कॅरेट चे दागीने ईथे असतात. त्यामुळे बारामती च्या व्यापाराला विशेष फायदा होईल असेही मत आळंदीकर यानी व्यक्त केले.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us