मुंबई : प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे अनेक नागरीकांचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. अशातच माहागाईचा भडका सतत उडताना पाहिला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. आता एसटीने प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्यासारखे झाले आहे. तिकिटात तब्बल १७ टक्के वाढ झाली आहे.
एसटीच्या नवीन दरपत्रकानुसार ९० किमी प्रवासासाठी ११५ रुपये मोजावे लागणार आहेत. यापुर्वी ९० किमी प्रवासाकरीता ९० रूपये भरावे लागत होते. सद्यस्थितीत पुर्वीपेक्षा आता २५ रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. पुर्वीपेक्षा आता दुप्पट पटीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना काळात एसटीच्या फेर्या कमी झाल्या होत्या. परंतु आता त्या पूर्ववत झाल्या आहेत.
या फेर्या वाढताच डिझेल जास्त प्रमाणात लागत असल्याने याचा परिणाम प्रवाशांवर होताना दिसणार आहे. महागाई भत्ता ७ टक्क्यांवरून १२ टक्के झाला आहे. त्यामुळे ५३ कोटींचा भार एसटी महामंडळावर पडला आहे. इंधन खर्च आणि टायर खर्चासह इतर खर्च इसटी महामंडळ सहन करत आहे. त्यामुळे आता हा बोजा प्रवाशांवर पडणार आहे.