बारामती : प्रतिनिधी
श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे बारामती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. तब्बल दोन वर्षानंतर निघालेल्या या पालखी सोहळ्याचे पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने स्वागत करण्यात आले. येथील श्रावण गल्ली तरुण मंडळाच्या वतीने या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
श्रावण गल्ली तरुण मंडळाच्या वतीने गेल्या ४२-४३ वर्षापासुन श्री संतराज महाराज पालखीतील वारकऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था श्रावण गल्ली येथे करण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या सेवेत खंड पडला होता. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे भाविकांनी मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं..
शुक्रवारी दि. १ जून रोजी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगरसेवक सुनील सस्ते व शाम इंगळे ,बारामती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश लगड यांच्या हस्ते श्री संतराज महाराज पालखीचे पूजन व आरती करण्यात आली.
श्रावण गल्ली तरूण मंडळ, मराठानगरच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बंधूंची भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाणी वाटप करण्यात आले.