
बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत मुक्कामी आहेत. त्यामुळे राजकीय पंढरी असलेल्या बारामतीत अर्थात शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे.
शरद पवार हे गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत मुक्कामी आहेत. गेली दोन दिवस शरद पवार यांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच माळेगाव कारखान्यासह विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी घेतला.
आज शरद पवार यांनी गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यामुळे आज गोविंद बागेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आज पवार भेटीसाठी उपलब्ध असल्याने राजकीय पंढरी असलेल्या बारामतीत कार्यकर्त्यांची रेलचेल पहायला मिळत होती.