बारामती : प्रतिनिधी
बारामती पंचायत समितीच्या माजी सदस्या संगिता दिलीपराव ढवाण पाटील यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
बारामती पंचायत समिती सदस्या म्हणून काम केलेल्या संगिता ढवाण यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. आज दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ होत आहे.
संगिता ढवाण या माळेगाव कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव ढवाण पाटील यांच्या पत्नी, तसेच इंदापूरचे माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप यांच्या कन्या आणि छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व बाळासाहेब घोलप यांच्या भगिनी होत.
दरम्यान, संगिता ढवाण यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.