आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने कला महोत्सवाचं आयोजन; चित्रकला स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग..

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.. या महोत्सवाअंतर्गत रविवारी महावीर भवन येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

बारामतीतील राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवाचं औचित्य साधत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात रविवारी महावीर भवन येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्याला बारामती इंडस्ट्रीज लि. चे निलेश कुलकर्णी यांच्या वतीने सायकल देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला हितेश पटेल यांच्याकडून स्मार्ट वॉच दिले जाणार आहे. तर तृतीय क्रमांकाला राजकमल तरुण मंडळ ट्रस्टकडून बॅग आणि आर्ट कीट असे बक्षिस दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे सायकल विजेत्या स्पर्धकाला १ लाख व ५० हजार रुपयांचा विमा संरक्षणही राहुल जगताप यांच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बारामतीतील सर्व कला शिक्षक, राजकमल तरुण मंडळ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे गोपाळ महामुनी आणि मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us