आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. १२ डिसेंबर आणि बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग २२ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.

मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी कनिष्ठ विभागाची आणि बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी वरिष्ठ विभागाची वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ६+२=८ मिनिटे वेळ देण्यात आला असून वरिष्ठ विभागासाठी रू.११०००, रू. ७०००, रू.३००० व रू.१००० आणि कनिष्ठ विभागासाठी रू.१००००, रु.५०००, रू.२०००, रू.१००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. दोन्ही विभागांसाठी सांघिक स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.आनंदा गांगुर्डे  यांनी दिली.

बारामतीची ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ ही संपूर्ण महाराष्ट्रात वक्तृत्वाचा मानदंड म्हणून नावारुपास आलेली स्पर्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी या गाजलेल्या स्पर्धेत सहभागी होत असतात.

कनिष्ठ विभागासाठी विषय : १. असा असावा माझा देश, २. लोकशाही टिकविणे काळाची गरज, ३. लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, ४. मा. शरदचंद्रजी पवार : झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा…, ५. वसुधैव कुटुंबकम् …

वरिष्ठ विभागासाठी विषय : १. चांद्रयान – ३ : भारताचा महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प, २. कविवर्य वसंत बापट यांची कविता, ३. कृत्रिम बुद्धिमत्ता – मानवी प्रज्ञेला आव्हान, ४. एम. एस. स्वामिनाथन : हरितक्रांतीचे प्रणेते, ५. महिला आरक्षणातून महिला सबलीकरण

ही वक्तृत्व स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेची नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ वाजाता केली जाईल. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र, स्वतःचे ओळखपत्र, मोबाईल नंबर व बँक डिटेल्स आदी माहिती नोंदणी करताना देणे आवश्यक आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर, पदविका या विभागातील विद्यार्थी स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.  प्रत्येक महाविद्यालयाला कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संघ पाठविता येईल.

अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख  डॉ. आनंदा गांगुर्डे (8149142453), डॉ. श्रीराम गडकर (9764850035), प्रा. सुनील डिसले (9960248517), प्रा. नंदकुमार खळदकर (8975062897), प्रा. शिवाजी टकले (9860993219) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us