
बारामती : प्रतिनिधी
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवारी दि .१२ जानेवारी रोजी स्किल डेव्हलपमेंट आणि पैसापाणी- काल, आज व उद्या या विषयावर लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या बाबत माहिती दिली.
विद्यानगरीतील गदिमा सभागृहात गुरुवारी सकाळी अकरा ११ वाजता हे व्याख्यान होणार असून सर्वांसाठी ते विनामूल्य खुले असणार आहे. ‘गोष्ट पैशापाण्याची’ या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक असलेले प्रफुल्ल वानखेडे विद्यार्थी व पालकांनाही स्किल डेव्हलपमेंट व पैसापाणी या विषयावर टीप्स देणार आहेत.
सोशल मीडियाच्या जगात जिथे लोक मनोरंजनात व्यग्र आहेत तिथे प्रफुल्ल वानखेडे आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलतेचे धडे देत असतात. ‘लेट्स रीड इंडिया’ या सशक्त वाचन चळवळीचे ते प्रणेते आहेत. योग्य पद्धतीने पैसा मिळवणे, वाढवणे आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणे यासाठी मूल्य, संस्कार रुजवण्याचे काम प्रफुल्ल वानखेडे अथक करीत आहेत.