आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

Baramati Breaking : पतीनेच मित्राला करायला लावला पत्नीसोबत घृणास्पद प्रकार, बारामती शहरातील तांदूळवाडीतील घटना..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

पतीच्या मित्रानेच एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील तांदूळवाडी येथे घडली आहे. विशेष म्हणजे, संबंधित विवाहितेच्या पतीनेच या कृत्यासाठी प्रोत्साहीत केल्याचं उघड झालं असून या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पतीसह संबंधित मित्रावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. 

शेखर सयाजी माळशिकारे (रा. तांदूळवाडी) आणि संबंधित विवाहितेच्या पतीवर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, शेखर माळशिकारे हा काल रात्री संबंधित विवाहितेच्या पतीसोबत त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी या विवाहितेच्या पतीने त्याला पत्नीशी संभोग करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यावर शेखर माळशिकारे याने संबंधित विवाहितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी शेखर माळशिकारे याच्यासह संबंधित विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे हे करीत आहेत. 


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us