आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत शिवसेना व युवासेनेची संजय राऊत यांच्या समर्थनार्थ, तर राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

ईडीच्या माध्यमातून राजकीय आकसापोटी महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही निषेध नोंदवत सह्यांची मोहिम राबवण्यात आली.

महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या व्यतिरिक्त सुडबुद्धीने कारवाई चालु आहे. आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ही राजकीय सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली. मग भाजपचे नेते हे काय धुतल्या तांदुळासारखे आहेत का असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला. या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा जाहिर निषेध केला.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना महाराष्ट्र द्वेष्टे वक्तव्य करत गुजराथ व राज्यस्थानची बाजू घेत महाराष्ट्रला हीन लेखले याचा निषेध करुन राज्यपालांना हटवण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने बारामतीत सह्यांची मोहिम हाती घेतली आहे. यावेळी राज्यपाल गो बॅक, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबादच्या  घोषणा देण्यात आल्या.

तालुका प्रमुख विश्वास मांढरे यांनी राज्यपाल कोशयारी ज्या राजकीय भूमीकेने प्रेरीत होऊन पक्षपाती भूमिका घेतात वारंवार महाराष्ट्राचा अवमान होईल असे वक्तव्य करतात आणि  विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल असे निर्णय घेतात.त्यांच्या वादग्रस्त पध्दतीवर टीका केली. याप्रसंगी युवासेनेचे निखिल देवकाते, दिग्विजय  जगताप, दिपक काशीद, सचिन दळवी, अनिल सोनवणे, प्रमोद पानसरे, दिलीप नाळे उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us