आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य सप्ताह’

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली. मुक्ताई रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माळेगावचे संचालक केशवराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व भारती मुथा, सर्व फोरम सदस्यांसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

१७ डिसेंबर पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी शिबिर तसेच हाडातील कॅल्शियम तपासणीसाठी बोन मॅरो डेन्सिटी शिबीर होणार असून यात ज्येष्ठ नागरिकांची तपासणी मोफत केली जाणार आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या तपासण्या होणार असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबीरासाठी फोरमच्या वतीने मधुमेह रूग्णांच्या तपासणीसाठी  गुलुकोमिटर आणि १००० ब्लड चेकिंग स्ट्रीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच बरोबर जेष्ठ नागरीकांची बोनमिनरल डेनसिटी चेकिंग मशिन हि उपलब्ध करून देण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us