
बारामती: प्रतिनिधी
बारामतीमधील बारामती सहकारी बँकेत अनेक पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेकडून वसुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी,कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर अशा २० हून अधिक या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
बारामती बँक ही राज्यातील अग्रगण्य बँक आहे. पुणे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात या बँकेच्या शाखा विस्तारलेल्या आहेत. या बँकेत नव्याने भरती सुरू करण्यात आली असून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२२ आहे.
• पदसंख्या – २०+
• शैक्षणिक पात्रता – पदानुसार
• अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन
• अर्जासाठी ई-मेल पत्ता-recruitment@baramatibank.com
• अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि बारामती सहकारी बँक लि.
मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि. पुणे – ४१३१०२
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०२२ अधिकृत वेबसाईट – www.baramatibank.com
• नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
• जाहिरातीची पीडीएफ – https://cutt.ly/7D67mcl