आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी; ७०० नागरिकांचा सहभाग

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशन, अविनाश बांदल मित्र परिवार यांच्या वतीने व के. के. बुधराणी नेत्र रुग्णालयाच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील जवळपास ७०० नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

बारामतीतील जिजाऊ सभागृहात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बालशिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तानाजी करचे, बारामती दुध संघाचे माजी संचालक प्रताप पागळे, किरण तावरे, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला बारामती बँकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश लगड, दीपक मलगुंडे, दूध संघाचे संचालक सतीश तावरे, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे, खरेदी विक्री संघाचे संचालक रवींद्र माने, बिल्डर असोसिएशनचे सदस्य मनोज पोतेकर, राजेंद्र खराडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे, शारदा खराडे, नगरसेविका नीलिमा मलगुंडे, अभिजीत जाधव, अतुल बालगुडे, सत्यवान शितोळे, दत्तात्रय माने, बाळासाहेब पाटील, मुकुंद करे, नवनाथ मलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक अविनाश बांदल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुधराणी रुग्णालयाचे मंजुर शेख व सहकारी, दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि अविनाश बांदल मित्र परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तानाजी बांदल यांनी आभार मानले.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us