आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

Baramati Breaking : केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा; बारामतीत वारकरी सांप्रदाय आणि कामगार संघटनांची मागणी

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी आज बारामती येथील कामगार व वारकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात बारामती तालुका पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. आता बारामतीत वारकरी सांप्रदाय आणि कामगार संघटनांच्या वतीने बारामती तालुका पोलिस ठाण्यात केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

संत तुकाराम महाराजांचे नाव घेवून शरद पवार यांच्यावर टिका करणाऱ्या केतकी चितळेने वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामूळे केतकी चितळेवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी कामगारांसह वारकरी सांप्रदायाकडून करण्यात आली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us