आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत आयोजित इपिलेप्सी शिबीरात ५२७ रुग्णांची तपासणी; रुग्णांच्या नातेवाईकांनी आयोजकांचे मानले आभार

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

इपिलेप्सी (फेफरे किंवा फीट येणे) या वर उपचार होऊ शकतात, रुग्णांवर वेळेत उपचार झाले तर इपिलेप्सी आटोक्यात ठेवणे शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ. निर्मल सूर्या यांनी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या वतीने बारामतीत रविवारी इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट येणे) शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यमपल्ले, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. बापू भोई, डॉ. महेश जगताप, अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे, विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, डॉ. अमोल शिंदे, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. अंजली शेटे, नंदकुमार कोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबीरामध्ये ३३६ पुरुष, तर १९३ महिला अशा एकूण ५२९ रुग्णांची डॉ. निर्मल सूर्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली. यात मेंदूची इलेक्ट्रीकल अँक्टिव्हीटी तपासणे- ५१, समुपदेशन-२५, फिजिओथेरपी-५९, ऑक्युपेशनल थेरपी-४३, स्पीच थेरपी-४२, मेंदूचे पुनर्वसन उपचार- १२ अशा पध्दतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली.

बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण तालुक्यातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक या शिबीरासाठी आले होते. बारामतीतील इपिलिप्सीचे हे १०४ वे शिबीर होते. डॉ. निर्मल सूर्या यांनी बारामतीत येत पंचक्रोशीतील रुग्णांसाठी या शिबीराच्या माध्यमातून तपासणी व उपचार करण्यासाठी जे सहकार्य केले त्या बद्दल सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बारामती गेल्या काही वर्षात मेडीकल हब म्हणून पुढे आला असून येथे रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार होतात, असे त्या म्हणाल्या.

इपिलिप्सी या बाबत समाजप्रबोधनाची गरज आहे. या रुग्णांवर योग्य उपचार व औषधोपचार झाल्यास आजाराची तीव्रता आटोक्यात राहू शकते, असे डॉ. सूर्या यांनी नमूद केले. तीन महिन्यानंतर पुन्हा या रुग्णांची तपासणी होणार आहे.

शिबीराचा फायदा होईल…..

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने या एका वेगळ्या शिबीराचे आयोजन केल्याचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना निश्चित फायदा होईल, अशी प्रतिक्रीया रुग्णांच्या नातेवाईकांनी शिबीर झाल्यावर व्यक्त केली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us