
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील ज्येष्ठ व्यापारी शांतीशेठ सराफ यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तसेच शहा-सराफ कुटुंबियांचं सांत्वनही केलं.
बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष, माळेगाव कारखान्याचे माजी संचालक आणि ज्योतीचंद भाईचंद सराफ या सुवर्णपेढीचे सर्वेसर्वा शांतीशेठ सराफ यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सराफ यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अजित पवार यांनी शहा-सराफ कुटुंबियांचं सांत्वन करत शांतीशेठ सराफ यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. व्यापार क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणारा एक ज्येष्ठ सहकारी आपल्यातून गेल्याचं यावेळी ना. अजित पवार यांनी सांगितलं.