बारामती : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे बारामती शहरात येत्या रविवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुढील आवर्तन सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून नंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
सध्या नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाले आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या साठवण तलावात पाणीसाठाही मर्यादित आहे. त्यामुळे बारामती शहरात पुढील काही दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विभागनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
रविवार दि. ९ जुलै रोजी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा होईल :
१) कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर
२) म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर इत्यादी
सोमवार दि. १० जुलै रोजी या भागात पाणीपुरवठा बंद राहील, मंगळवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार
१) कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांडुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली,नेवसे रोड.
२)संपुर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर
३) जवाहरनगर, पोष्ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, सिध्दार्थनगर
सध्याच्या उपलब्धतेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पर्याप्त साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.