आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : बारामती तालुक्यातील पानसरेवाडीत पाण्यातून विषबाधा; अकरा बकऱ्यांसह तीन शेळ्यांचा मृत्यू

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पानसरेवाडी परिसरातील तांबेवस्ती येथे पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याच्या जवळपास अकरा बकऱ्यांसह तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. या शेतकऱ्याला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील पानसरेवाडी परिसरातील तांबेवस्ती येथील किसन विठोबा तांबे यांचा शेळी-मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय आहे. आज दुपारी त्यांच्या कळपातील बकरे व शेळ्यांना पाण्यातून विषबाधा झाली. त्यामध्ये ११ बकरी व ३ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तलाठी श्री. यादव, कोतवाल राहुल बोडरे, सरपंच आबासाहेब पानसरे, माजी सरपंच राजेंद्र पानसरे, माजी सरपंच बाबासाहेब पानसरे, राजकुमार लव्हे, अजित कदम, रघुनाथ चांदगुडे, भाऊसो गदादे, पिंटू पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही या घटनेची तपासणी केली जाणार आहे. या घटनेमुळे किसन तांबे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे  प्रशासनाने या शेतकऱ्याला तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us