
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारामती शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहाटे ६ वाजता अजितदादा विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, सकाळी १०-३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचेही आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं उद्या रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी बारामतीत येत आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादांचा दौरा सुरू होणार आहे. विविध विकासकामांच्या पाहणीनंतर सकाळी ८ वाजता मळद येथे स्केटिंग ट्रॅकचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ९ वाजता देसाई इस्टेट येथे विशाल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
सकाळी १०-३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उपस्थित राहून अजितदादा नागरीक व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२-३० वाजता चिराग गार्डन येथे बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्याला अजितदादा उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेनंतर अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.